E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कर्नाटक हापूसचा हंगाम बहरला
Samruddhi Dhayagude
06 May 2025
पुणे : कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, कर्नाटकातून आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे कर्नाटकातील हापूसचा हंगाम बहरला आहे. या आंब्यांना गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांची मागणी वाढत आहे. यंदा वातावरणातील बदलामुळे हापूसची लागवड कमी प्रमाणावर झाली आहे. जून महिन्यापर्यंत कर्नाटकातील आंबा बाजारात उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती व्यापारी रोहण उरसळ यांनी दिली.
कर्नाटकातील टुमकूर भागात आंब्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कर्नाटकातील आंब्याची चव कोकणातील हापूसप्रमाणेच आहे. दरवर्षी कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम १५ एप्रिलपर्यंत सुरू होतो. यंदा कर्नाटक आंब्यांचा हंगाम १५ दिवस उशिराने सुरू झाला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आवकही चांगली आहे. यंदा हापूसचा हंगाम लवकर संपणार आहे. देवगड, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून होणारी आंब्याची आवक कमी झाली आहे. कर्नाटक आंब्यांचा हंगाम सुमारे १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. हापूस बाजारात उपलब्ध नसल्याने ग्राहकांकडून कर्नाटक आंब्यांच्या मागणीत वाढ होणार आहे, असेही उरसळ यांनी सांगितले.
मार्केट यार्डातील फळबाजारात कर्नाटकातून पाच ते सात हजार पेट्यांची आवक झाली. एका पेटीत तीन ते पाच डझन आंबे असतात. कर्नाटकातील आंब्यांची दोन डझनाची खोकी विक्रीस उपलब्ध आहेत. बाजारात दोन डझनाच्या २० हजार खोक्यांची आवक झाली, तसेच लालबाग, पायरी, बदाम या आंब्यांची पाच हजार प्लास्टिक जाळ्यांमधून (क्रेट) आवक झाली. कोकणातील आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा हवामान बदलामुळे कोकणात आंब्यांची लागवड कमी झाली.
दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारात हापूस उपलब्ध असतो. यंदा महिनाभर आधीच हापूसचा हंगाम संपणार आहे. कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम १५ जूनपर्यंत सुरू राहणार असून, त्यामुळे हापूसप्रेमींची पावले आता कर्नाटक आंब्यांकडे वळणार आहेत. कर्नाटकातील आंब्यांची चव हापूसप्रमाणे असते. मात्र, कर्नाटकात लागवड होत असल्याने या आंब्याला कर्नाटक हापूस असे म्हटले जाते, असेही रोहन उरसळ यांनी सांगितले.
कर्नाटक आंब्यांचे दर
डझन
दर
तीन ते पाच डझन
१००० ते १६०० रुपये
दोन डझन पेटी
३०० ते ५०० रुपये
पायरी चार डझन
१००० ते १५०० रुपये
लालबाग
४० ते ६० रुपये किलो
बदाम
४० ते ५० रुपये किलो
Related
Articles
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
28 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
28 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
28 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
28 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
3
तुर्कस्तानला दणका
4
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
5
आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
राज्यात मान्सून स्थिरावला